पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अद्याप प्रस्ताव आलेला नाही. त्यांनी त्यांच्या अमराठी भाषिकांबद्दल भूमिका बदलली, तर त्यावर पक्ष नेतृत्व निर्णय घेईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. येणाऱ्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर आज (गुरुवारी) चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका मांडली.
'मनसेने अमराठी भाषिकांबद्दलची भूमिका बदलल्यास त्यावर नेतृत्व निर्णय घेईल' - chandrakant patil latest news pune
मनसेच्याबाबतीमध्ये भाजपच्या नेत्यांनी बसून विचार करायचा आहे. मनसेकडून अजून प्रस्ताव आलेला नाही. आम्हाला त्यांची अमराठी भाषिकांच्या बद्दलची भूमिका आहे, ती स्वाभाविकपणे त्यांना बदलावी लागेल.
मनसेच्या बाबतीमध्ये भाजपच्या नेत्यांनी बसून विचार करायचा आहे. मनसेकडून अजून प्रस्ताव आलेला नाही. अमराठी भाषिकांच्या बद्दलची मनसेची भूमिका त्यांना स्वाभाविकपणे बदलावी लागेल. 80 टक्के स्थानिकांना नोकरी मिळाल्यानंतर 20 टक्के व्यक्तींमध्ये अमराठी येणार की नाही? अमराठी कुठल्यातरी पाकिस्तान आणि बांगलादेश मधले आहेत का? असा सवालही त्यांनी केला आहे. ही भूमिका जर त्यांनी बदलली तर आमचे नेतृत्व बसून निर्णय घेईल, असेही पाटील म्हणाले.
हेही वाचा -उदयनराजेंवरील टीकेनंतर साताऱ्यात बंद, गाढवांच्या गळ्यात राऊत-आव्हाडांच्या पाट्या बांधून निषेध