पुणे-राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. आचारसंहिता लागू झाली तरीही अजून महायुतीची घोषणा होत नाही, हे कशाचे लक्षण आहे? भाजपला खरेच युती करायची आहे का? असा प्रश्न शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी उपस्थित केला आहे. आतापर्यंत भाजप आणि शिवसेनेत दोन-तीन बैठका झाल्या आहेत. परंतु, या बैठकांमध्ये महायुतीतील घटक पक्षांना विचारात घेण्यात आले नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. पुण्यातील जवाहरलाल नेहरू आर्ट गॅलरीत शिवसंग्राम पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला यावेळेस ते बोलत होते. भाजपला खरेच महायुती करायची असेल तर त्यांनी सर्वात आधी घटक पक्षांसोबत चर्चा केली पाहिजे. परंतु, असे होताना दिसत नाही. असे सांगत शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
भाजप घटक पक्षांना विचारात घेत नाही, विनायक मेटेंचा आरोप - मुख्यमंत्री
शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मेटे म्हणाले, लोकसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी मित्रपक्षांशी जागा वाटप होईल आणि त्यानंतरच भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटल्या जातील, असे सांगितले होते. पण तसे होताना दिसत नाही.
शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मेटे म्हणाले, लोकसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी मित्रपक्षांशी जागा वाटप होईल आणि त्यानंतरच भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटल्या जातील, असे सांगितले होते. पण तसे होताना दिसत नाही. महायुतीत शिवसंग्राम पक्षाने 12 जागांची मागणी केली आहे. यावर आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोललो आहोत. मात्र, ही चर्चा पुढे सरकत नाही. त्यामुळे युतीची चर्चा होत असताना भाजपने इतर घटक पक्षांनाही विश्वासात घेणे गरजेचे आहे. असे मत मेटे यांनी व्यक्त केले. युती नाही झाली तरीही शिवसंग्राम स्वतंत्र लढण्यास तयार आहे. युती झाली आणि युतीतील घटकपक्ष भाजप चिन्हावर लढले तर आम्हीही भाजप चिन्हावर लढू, असेही मेटे यांनी स्पष्ट केले आहे.