महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिरुर लोकसभेची जागा भाजपला द्यावी; कार्यकर्त्यांच्या बैठकीत भाजप निरिक्षकांची मागणी

जिल्ह्यातील शिरुर लोकसभा हा मतदार संघ मोठा प्रतिष्ठेचा मतदार संघ म्हणुन ओळखला जाऊ लागला आहे. या मतदारसंघात भाजप शिवसेना युती झाल्यानंतर राजकिय वर्तुळात शिरुर लोकसभेची जागा भाजपाला मिळावी, यासाठी हलचाली सुरू झाल्या आहेत.

pune

By

Published : Feb 22, 2019, 9:32 PM IST

पुणे - जिल्ह्यातील शिरुर लोकसभा हा मतदार संघ मोठा प्रतिष्ठेचा मतदार संघ म्हणुन ओळखला जाऊ लागला आहे. या मतदारसंघात भाजप शिवसेना युती झाल्यानंतर राजकिय वर्तुळात शिरुर लोकसभेची जागा भाजपाला मिळावी, यासाठी हलचाली सुरू झाल्या आहेत. गेल्या १० वर्षापासून शिरुर लोकसभा हा मतदार संघ शिवसेनाचा लोकसभेसाठी बाल्लेकिल्ला झाला आहे.

pune

या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस वर्चस्व मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, सक्षम पर्यायी उमेदवार उभा रहात नसल्याने शिवसेना खासदार शिवाजी आढळराव यांची शिरुर मतदार संघावर पकड वाढत आहे. आता शेतकऱयांचे प्रश्न, पुणे-नाशिक रेल्वे, विमानतळ, पुणे-नाशिक महामार्ग या प्रकल्पावरुन खासदार शिवाजी आढळराव यांना जनतेतून प्रश्न विचारले जात असल्याने, जनतेतुनच शिवसेनेवर नाराजी असल्याचे भाजपकडुन बोलले जात आहे. भाजप-शिवसेना युतीतून ही जागा भाजपला देण्यात यावी, अशी मागणी भाजप निरीक्षक शिवाजी भुजबळ यांनी केली, ते चाकण येथे कार्यकर्ता बैठकीत बोलत होते.

भाजपची गेल्या ५ वर्षापासून शिरुर लोकसभा मतदारसंघात ताकद वाढत चालली आहे. हडपसर विधानसभा, शिरुर विधानसभा, भोसरी विधानसभा, राजगुरुनगर, आळंदी नगरपरिषद, जिल्हापरिषद पंचायत समिती अशा अनेक ठिकाणी भाजपने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे शिवसेनेपेक्षा भाजपची ताकद शिरुर लोकसभा मतदार संघात वाढली आहे. त्यामुळे भाजप शिरुर लोकसभा ही जागा सहज जिंकून देईल, असा विश्वास अतुल देशमुख यांनी व्यक्त केला. दरम्यान शिरुर लोकसभेची युतीची जागा भाजपाला दिल्यावर सलग ३ वेळा निवडून येणाऱ्या शिवाजी आढळराव यांचे काय? असाही प्रश्न या निमित्ताने उभा राहील.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details