महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिंचवडमध्ये भाजप नगरसेविकेच्या मुलाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या - चिंचवड भाजप नगरसेवक मुलगा मृत्यू बातमी

चिंचवडमध्ये भाजप नगसेविकेच्या मुलाच्या मृत्यू झाला. त्याने वडिलांच्या परवानाधारक पिस्तुलातून गोळी झाडून घेतली. भाजप नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे यांचा तो मुलगा आहे.

Prasanna Chinchwade
प्रसन्न चिंचवडे

By

Published : Mar 29, 2021, 10:08 AM IST

पुणे :पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप नगरसेविकेच्या मुलाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. प्रसन्न शेखर चिंचवडे (वय- 21), असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री सव्वा नऊ वाजता घडली. रात्री उशिरा उपचारादरम्यान प्रसन्नचा मृत्यू झाला आहे. प्रसन्न भाजप नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे यांचा मुलगा आहे.

पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या -

मृत प्रसन्न चिंचवडेने रुममध्ये वडिलांच्या परवानाधारक पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. गोळी झाडल्यानंतर आलेल्या आवाजामुळे ही घटना घरातील व्यक्तींना समजली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रसन्नला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारादरम्यान झाला मृत्यू -

त्याच्यावर उपचार सुरू केले. परंतु, रात्री उशिरा त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रसन्नने आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, परवानाधारक पिस्तुल खेळत असताना गोळी सुटून अपघाती मृत्यू तर झाला नाही ना या दिशेने देखील पोलीस तपास करत आहेत.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details