महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महिला अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन, मात्र अनेक नगरसेवकांची दांडी - पिंपरी चिंचवड महापालिका

महिला अत्याचार आणि महाविकास आघाडी सरकारविरोधात आज (मंगळवार) भाजपच्यावतीने पिंपरी चिंचवडमध्ये आंदोलन केले.

bjp
महिला अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन

By

Published : Feb 25, 2020, 8:16 PM IST

पुणे- महिला अत्याचार आणि महाविकास आघाडी सरकारविरोधात आज(मंगळवार) भाजपच्यावतीने पिंपरी चिंचवडमध्ये आंदोलन केले. या पालिकेत भाजपचे तब्बल ९० नगरसेवक आहेत. मात्र, या आंदोलनाला बहुतांश नगरसेवक गैरहजर होते. आंदोलनातील उपस्थितांपैकी बघ्यांचीच गर्दी जास्त असल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे नगरसेवकांना याचे काहीच गांभीर्य नसल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

महिला अत्याचाराविरोधात भाजपचे आंदोलन

पाच वर्ष सरकारमध्ये असताना आपण काय काम केले ते पाहावे म्हणजे त्यांना आंदोलन का करतोय याचा संभ्रम होईल, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपच्या या आंदोलनावर लगावला आहे.

खासदार अमोल कोल्हे

ABOUT THE AUTHOR

...view details