पुणे - शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वाढती महागाई आणि महिलांवरील वाढते अत्याचार या घटनांविरोधात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यावेळी पिंपरी-चिंचवडसह मावळ परिसरात भाजपच्यावतीने महाविकास आघा़डी सरकारविरोधात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याचा आरोप संबंधित भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत आणि महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. याविरोधात आज(मंगळवार) भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले आहे. यावेळी महाविकस आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजप पिंपरी-चिंचवड शहराच्यावतीने महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या नेतृत्वात पिंपरी-चिंचवडच्या तहसीलदार गीता गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी महिलांची लक्षनिय उपस्थिती होती. यावेळी काळ्या फिती लावून महाआघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.