पिंपरी-चिंचवड(पुणे) - गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर भाजप आक्रमक झाली असून पिंपरी-चिंचवड शहरामध्ये भाजप महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी गृहामंत्र्यांचा निषेध करत आंदोलन केले. यावेळी घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. यावेळी भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, एकनाथ पवार यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
देशभरात उडाली आहे खळबळ
परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केला आहे की, पोलीस अधिकाऱ्यांनी बार आणि हॉटेलमधून दरमहा 100 कोटी रुपये जमा करावेत, असा आदेश दिला होता. यावरून देशभरात खळबळ उडाली असून राजकीय पक्ष आणि नेते गृहमंत्री देशमुखांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात भाजपच्या वतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निषेध करत आंदोलन करण्यात आले. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.