पिंपरी-चिंचवड (पुणे) -मावळमधील एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या सुखद धक्क्याने रुग्ण भाराहून गेला होता. माझ्या आयुष्यातील अत्यंत सुखद क्षण असल्याचे प्रतिक्रिया रुग्णाने दिली.
कोरोनाबाधीत रुग्णाचा वाढदिवस साजरा खासगी रुग्णालयात सुरू आहे उपचार -
मावळमधील खासगी पवना रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून एका कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांच्यात कमालीची सुधारणा झाली आहे. असे असताना त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
अतिदक्षता विभागातच वाढदिवस साजरा -
दरम्यान, आज त्याचा वाढदिवस असल्याचे त्यांच्या मुलाने डॉक्टरांना फोन करून सांगितले. तसेच, वडील कोरोना बाधित असून रुग्णालयात उपचार घेत असल्याने वाढदिवस साजरा करता येणार नाही, अशी खंतही त्यांनी डॉक्टरांकडे बोलून दाखविली. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले. अतिदक्षता विभागाला बर्थडे सेलिब्रेशन हॉलमध्ये बदलत सुखद धक्का कोविड रुग्णाला देण्यात आला. यावेळी सर्व नियम पाळून वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेगळ्या उपक्रमामुळे डॉक्टरांचे कौतुक होत आहे.
हेही वाचा - काँग्रेसच्या विरोधाला न जुमानता मुख्यमंत्री कार्यालयाकडून संभाजीनगर नावाचा वापर सुरूच