पुणे : पुण्यातील मंडई येथे अभिजीत बिचुकले (Bigg Boss fame Abhijit Bichukle accident) यांचे पेढ्याचे दुकान असून त्यानिमित्त ते पुण्यात राहतात. आज ते त्यांच्या 4 मित्रांबरोबर जात असताना त्यांचा अपघात झाला. यामध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत (Abhijit Bichukle injured in accident) झाली आहे. आज माझा अपघात झाला असून मला किरकोळ दुखापत झाली आहे. (Pune Crime) डॉक्टरांच्या सल्ल्याने मी 4 दिवस विश्रांती घेत असून लवकरच समाजकार्यासाठी बाहेर येणार असल्याचे यावेळी बिचुकले यांनी सांगितले. (Latest news from Pune)
Abhijit Bichukle Accident : 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकलेंचा पुण्यात अपघात - बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले अपघात
बिग बॉस फेम अभिजित बिचुकले (Bigg Boss fame Abhijit Bichukle accident) यांचा आज पुण्यात अपघात झाला असून त्यांच्या डोक्याला दुखापत (Abhijit Bichukle injured in accident) झाली आहे. त्यांच्या सोबत प्रवास करणारे ४ मित्र देखील जखमी झाले आहेत. अपघातानंतर बिचकुले यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. (Pune Crime) त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. (Latest news from Pune)

बिचुकले यांच्याविषयी थोडक्यात :कवी मनाचा राजकारणी म्हणून बिचकुलेंची महाराष्ट्रात ओळख आहे. बिस बॉस मराठी आणि बिग बॉस हिंदीचा मंच देखील अभिजित बिचुकले यांनी गाजवला आहे. अभिजितने बिचुकले हे मुळचे साताऱ्यातील असून त्यांनी राजकारणाच्या मैदानात देखील नशीब आजमावले आहे. सातारा विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आणि त्यांच्या पत्नीने उमदेवारी अर्ज दाखल केला होता. तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात देखील बिचुकले यांनी निवडणूक लढवली आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी देखील बिचुकले यांनी तयारी केली होती. महाराष्ट्रातील राजकारणावर आणि मुद्द्यांवर तो परखड भाष्य करण्यासाठी ते ओळखले जातात.