पुणे:आमच्या कार्यपद्धतीनुसार आम्ही तयारीला लागलो आहोत, कसब्यातील कार्यालयातून पुढील बैठका होतील. गिरीष बापट यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक होईल. तीन समित्या केल्या आहेत. ज्या कसबा विधानसभा मतदारसंघाचे गेल्या 25 वर्षांपासून नेतृत्व केलेले खासदार गिरीश बापट हे पुन्हा मतदार संघात सक्रिय झालेले आहेत. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष राहिलेले आहे. तर आता खुद्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार असल्याचे सांगितल्याने गिरीश बापट ज्या उमेदवाराच्या पारड्यात आपले मत टाकतील त्याला तिकीट मिळण्याची शक्यता वाढली आहे. परंतु या पोटनिवडणुकीत जे इच्छुक उमेदवार आहेत त्यामध्ये शैलेश टिळक त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता जास्त असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
निवडणुकीची तयारी ही आधीपासूनच :हे मतदार संघ जरी परंपरागत आमचेच असले तरी निवडणुकीची तयारी ही आधीपासूनच करावी, अशी आमच्या पक्षाची रणनीती आहे. त्यामुळे आजची बैठक घेतली मतांचे मार्जिन कसे वाढेल यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले. कसबा पोटनिवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. राजीव सातव गेल्यानंतर आम्ही बिनविरोध दिली. हा दाखला महाविकास आघाडी का देत नाही? इच्छुकांची नावे प्रदेशाकडे पाठवली जातात. नंतर दिल्लीतून घोषणा होईल. विकास आघाडीच्या महानेत्याने आधीच निवडणुकीबाबत चर्चा सुरू केल्याने आम्ही तयारी सुरू केली आहे, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांचा सुद्धा समाचार घेतला आहे. कसबा पोटनिवडणुकीबाबत आमचा सर्वे चालू आहे. तर २५ तारखेला चिंचवड विधानसभेबाबत बैठक होईल.
संजय राऊतांचा घेतला समाचार :आम्ही घरातला देणार नाही असे कोणी सांगितले? तुम्ही टिळकांच्या घरातीलच उमेदवार देणार असा अर्थ काढायचा का? या प्रश्नाला उत्तर देताना आमच्याकडे दिल्लीतून नावे ठरतात, असेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेले आहे. संजय राऊत जेलमध्ये होते. त्यानंतर चार दिवस शांत होते. पण आता बोलायला लागले. संजय राऊत बोलायचे तेव्हा सगळ्यांना उत्सुकता होती. पण आता ते कुठून बोलतात हे तुमच्याकडून कळते, असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांनी जम्मू-काश्मीरमधील केलेल्या वक्तव्याचा समाचार सुद्धा यावेळी घेतला आहे.