पुणे : पुणे शहरात मागच्या महिन्यात सेक्सटॉर्शनच्या त्रासाला कंटाळून 2 युवकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. वर्षभरात पुणे सायबर पोलीस स्टेशन येथे सेक्सटॉर्शनचे तब्बल 1400 अर्ज आले आहे. तर सेक्सटॉर्शन बाबत एक गुन्हा दाखल आहे. आत्ता या सेक्सटॉर्शनच्या घटनेत पुणे पोलिसांना मोठा यश आलं आहे. पुण्यात जे दत्तवाडी भागात राहणाऱ्या 19 वर्षीय शंतनू वाडकर या तरुणाने आत्महत्या केली होती. या प्रकरणी पुणे पोलिसांनी यातील मुख्य आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे पुणे पोलिसांनी अधिकचा तपास केला असता, हा आरोपी ज्या गावातील आहे. तो गाव 500 घरांचा आणि या गावात घरातील एक जण हा अश्या सेक्सटॉर्शन तसेच सायबर गुन्ह्याशी निगडित आहे. अन्वर सुबान खान २९ वर्षे रा. गुरुगोठडी ता लक्ष्मणगठ जि अलवर रा. ह राजस्थान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
दत्तवाडी प्रकरणात आरोपी अटक :पुण्यातील दत्तवाडी भागात राहणाऱ्या 19 वर्षीय शंतनू वाडकर या तरुणाच प्रीत यादव या तरुणी सोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली. पुढे दोघांमध्ये ओळख झाल्यावर त्याने तिला अर्धनग्न फोटो पाठवले. त्यानंतर त्या तरुणीने पैसे दे, अन्यथा सोशल मीडियावर फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली. आणि या सततच्या त्रासाला कंटाळून या 19 वर्षीय शंतनू वाडकर या तरुणाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांकडून याचा तपास करण्यात येत होता. आणि अशा प्रकारे महाराष्ट्र तसेच देशभर ऑनलाईन सेक्सटॉर्शन करून खंडणी मागण्याचा घुमाकुळ घातला आहे. देशात धुमाकुळ घालणाऱ्या राजस्थान मधील गुरुगोठडी ता.लक्ष्मणगढ जि. अलवर मधुन यंत्रणा चालविणाऱ्या मास्टरमाईंड आरोपी नामे अन्वर सुबान खान वय २९ वर्षे रा. गुरुगोठडी ता.लक्ष्मनगढ जि. अलवर राज्य राजस्थान यास दत्तवाडी पोलीस स्टेशन सायबर गुन्हे तपास पथकाने तांत्रीक विश्लेषन करून व लोकेशनव्दारे शोध घेऊन ताब्यात घेतले आहे.
वेषांतर करून पोलिसांनी पकडलं :दत्तवाडी पोलिसांकडून 5 लोकांचं एक पथक हे गुरुगोठडी ता.लक्ष्मनगढ जि. अलवर राज्य राजस्थान येथे पाठविण्यात आले होते. पोलिसांनी यावेळी व्याशंतर करून त्या गावात गेले आणि आरोपीची माहिती घेतली. आणि डोक्यावर पगडी, गमछा असा तेथील पोशाख परिधान केला आणि गुरुगोठडी या गावात ते गेले.आणि आरोपीला अटक केली. आरोपीला त्याच्या घराकडून घेवून जात असतांना आरोपीच्या नातेवाईकांनी व गावातील लोकांनी पोलिसांना विरोध केला. पोलिसांवर दगडफेक करुन आरोपीस पळवून लावले असता. त्या आरोपीचा ०२.५ कि.मी पाठलाग वारून, जीवाची पर्व न करता दत्तवाडी पोलीस स्टेशन सायबर गुन्हे तपास पथकाने ०५ मोबाईल सह आरोपीस ताब्यात घेतल आहे.
जामतारा 2 : मध्यंतरी जामतारा या गावावर आधारित एक वेब सिरीज आली होती. यात अख्खा गाव हा सायबर गुन्हे करत होता. तसेच राजस्थान मधील गुरुगोठड या गावात देखील असाच प्रकार हा समोर आला आहे. या आरोपी अन्वर खान यांच्याकडे अधिक चौकशी करता त्यागावातील सर्वाधिक मुले व महिला अशाप्रकारचे ऑनलाईन सेक्सटॉर्शनचे प्रशिक्षण घेवून अशा प्रकारे नागरिकांना ब्लॅकमेल करून खंडणी मागण्याचे प्रमाण गुरुगोटडी ता.लक्ष्मणगढ जि. अलवर (राजस्थान) गावात मोठ्या प्रमाणात चालते.
कशी होते फसवणूक :साधारणतः हा आपल्याला आपल्या व्हॉट्सॲपवर एका नंबरवरून सुंदर मुलीचं फोटो येतो. आणि त्यांनतर हळूहळू ओळख केली जाते.आणि जस जशी ओळख निर्माण होते तसच समोरून आग्रह केला जातो की व्हिडियो कॉल वर बोलूया. आणि त्यानंतर जेव्हा व्हिडियो कॉल केला जातो. तेव्हा समोर असलेली मुलगी न्यूड होते. ती आपल्याला ही न्यूड होण्याबाबत आग्रह करते. चेहरा कॅपचर करण्यासाठी दोन मिनिटांचा व्हिडियो कॉल केला जातो. आणि लगेच व्हॉट्सॲपवर या व्हिडिओ कॉलचा व्हिडिओ येतो. तेथून धमक्यांना सुरवात होते. पहिल्यांदा अशी धमकी दिली जाते की, जर आपण पैसे नाही दिले, तर मी तक्रार दाखल करेल. अन्यथा सोशल मीडियावर व्हायरल करेल, अशी धमकी दिली जाते. याच धमकीला तरुण बळी पडतात. आणि पैसे देतात. जर पैसे दिले गेले नाही, तर सोशल मीडियावर व्हायरल केलं जातं आणि बदनामी होऊ नये, म्हणून तरुण टोकाचं पाऊल उचलतात.