पुणे :दिवाळीच्या तयारीसाठी विदर्भातील नागरीक काही महिने आधीच तिकीट काढून ठेवतात. यंदा सगळ्या गाड्यांचं बुकिंग पूर्ण होत आले होते. शिवाय अनेकांनी अधिकचे पैसे मोजून तिकीट खरेदी केले होते. दिवाळीच्या प्रवासाची सोय करुन ठेवली ( Good news for trains going from Pune to Vidarbha) होती. मात्र गाड्या रद्द झाल्याने त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला होता.
पुण्यातून विदर्भात जाणाऱ्या रेल्वे : पुण्यातून विदर्भात जाणाऱ्या रेल्वे 19 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आल्या आहेत. दिवाळीच्या तोंडावर रेल्वे प्रशासनाने विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा दिला आहे. दौंड ते मनमाड या मार्गाचे दुरुस्तीचे काम सुरु असल्याने 18 ऑक्टोबरपर्यंत या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली होती. मात्र या मार्गाचं काम पूर्ण झाल्याने या रेल्वे पुन्हा रुळावर येणार आहे. त्यामुळे विदर्भात जाणाऱ्या नागरीकांचा घर गाठण्याचा प्रश्न मिटला आहे. गाड्या सुरू झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गाड्या पुन्हा सुरु :अजनी एक्स्प्रेस , पुणे-नागपूर हमसफर, पुणे-नागपूर गरीबरथ, अमरावती एसी एक्स्प्रेस. विदर्भात जाण्याऱ्या सर्वा गाड्यांचे बुकिंग फुल झाले आहेत. त्यामुळे रेल्वेकडून पुणे-अजनी ही दिवाळी स्पेशल गाडी सुरु करण्यात आली आहे. 18 ऑक्टोंबर ते 29 नोव्हेंबरपर्यंत ही गाडी सुरु असणार आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेत ही विशेष रेल्वे सुरु करण्यात आली आहे. प्रत्येक मंगळवारी ही गाडी पुण्यातून सुटणार आहे आणि नागपूरला जाणाऱ्या बाकी गाड्यांना देखील अतिरिक्त कोच लावण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली आहे.
ट्रॅव्हल्सची तिकीटं सामान्यांना न परवडणारी :नागपूर आणि अमरावतीहून पुण्यात येणाऱ्या गाड्याही धावणार नसल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले होते. या गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांना रेल्वेने नागपुरात जाण्यासाठीचा मार्ग बंद झाला होता. एवढ्या कमी काळात आता विदर्भात जाण्यासाठी दुसरा मार्ग मिळणे अवघड होते त्यामुळे दिवाळीला घर कसं गाठायचं हा प्रश्न निर्माण झाला होता. दरवर्षी दिवाळी आली की ट्रॅव्हल्सची तिकीटं वाढवण्यात ( Travel tickets are unaffordable for common people) येतात. एरवी 1200 रुपये असलेलं तिकीट दिवाळीच्या काळात 4000 रुपये असतं. मात्र या गाड्या सुरु केल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. मात्र बुकिंग फुल झाले तर अनेकांना महाग तिकीटे काढून घर गाठावे लागणार आहे.