महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बायडन हे तर पूर्वीचे भिडे - गिरीश बापट - Pune District Latest News

पुण्याचे नागरिक खूप हुशार असतात ते प्रत्येक गोष्ट पुण्याशी जोडून मोकळे होतात. असं वक्तव्य खासदार गिरीश बापट यांनी केले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की जो बायडन हे अमेरिकेचे अध्यक्ष आहेत, मात्र एक जण बोलता बोलता म्हणून गेला की बायडन हे पूर्वीचे भिडे होते, आणि त्यांचे वास्तव्य पुण्यात होतं.

MP Girish Bapat Latest News
खासदार गिरीश बापट

By

Published : Dec 25, 2020, 10:35 PM IST

पुणे - पुण्याचे नागरिक खूप हुशार असतात ते प्रत्येक गोष्ट पुण्याशी जोडून मोकळे होतात. असं वक्तव्य खासदार गिरीश बापट यांनी केले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की जो बायडन हे अमेरिकेचे अध्यक्ष आहेत, मात्र एक जण बोलता बोलता म्हणून गेला की बायडन हे पूर्वीचे भिडे होते, आणि त्यांचे वास्तव्य पुण्यात होतं. असाच दुसरा एक किस्सा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल आहे, इंदिरा गांधी यांचे शिक्षण हुजिरपागा शाळेत झाल्याचे सांगण्यात येते. देवेद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांचे काका पुण्यात राहात असल्याचे एक पुणेकर म्हणून गेला. थोडक्यात काय तर पुणेकर असताच खूप हुशार.

बायडन हे तर पूर्वीचे भिडे

रघुनाथ माशेलकर यांना अटल संस्कृती गौरव पुरस्कार

पुण्यात संस्कृती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अटल संस्कृती गौरव पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी हा पुरस्कार पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना देण्यात आला. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी बापट बोलत होते. या पुरस्कार वितरण सोहळ्याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ यांची देखील उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details