महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बिबट्याचा मेंढपाळाच्या वाड्यावर हल्ला, एक मेंढी दगावली - बिबट्याचा मेंढपालाच्या वाड्यावर हल्ला

बिबट्याने मेंढपाळाच्या वाड्यावर हल्ला केल्याची घटना आंबेगाव तालुक्यातील मंचर वाघवाडी परिसरात घडली. या हल्ल्यात बिबट्याने एका मेंढीची शिकार केली.

बिबट्याचा मेंढपालाच्या वाड्यावर हल्ला

By

Published : Nov 13, 2019, 10:00 PM IST

पुणे - बिबट्याने मेंढपाळाच्या वाड्यावर हल्ला केल्याची घटना आंबेगाव तालुक्यातील मंचर वाघवाडी परिसरात घडली. या हल्ल्यात बिबट्याने एका मेंढीची शिकार केली. बिबट्याच्या वास्तव्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरुर तालुक्यात बिबट्यांचे पाळीव प्राण्यांवर हल्ले वाढत आहेत. आज पहाटेच्या सुमारास पोपट ढाकले या मेंढपाळाच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यामध्ये एका मेंढी दगावली आहे. यामध्ये मेंढपाळाचे १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ऊस शेतीत बिबट्याचे वास्तव्य पाहायला मिळत आहे. रात्रीच्या सुमारास बिबटे शिकारीच्या शोधात बाहेर पडत आहेत. दिवसें दिवस बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. त्यामुळे मानवी वस्तीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details