पुणे Lalit Patil Case:पोलिसांकडून 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. परंतु न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी दिलेली आहे. पुण्यामध्ये मोठे ड्रग्स रॅकेट चालू असल्याची घटना रविवारी समोर आली होती. ससून हॉस्पिटल गेटवर दोन कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले होते. यात रौफ शेख, आकाश मंडल या दोघांना अटक करण्यात आली होती. हे दोघे ललित पाटीलसाठी काम करत होते. या दोघांना अटक झाल्यावर ललित पाटील पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला होता. त्यानंतर पोलिसांनी ललित पाटील याला पळून जाण्यासाठी मदत ज्यांनी केली त्या ड्रायव्हर दत्ता डोके याला अटक केली होती. हा यापूर्वी एका आरोपीकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता. तसेच 16 नंबरमध्ये ससून वार्डात आरोपी आहेत त्या ठिकाणी डब्बा घेऊन जात होता. त्यानेच ललित पाटीलला गाडीमध्ये पुण्याच्या बाहेर येऊन सोडले होते.
दोघांना वाराणसी सीमेवरून अटक:एवढ्या मोठ्या प्रमाणात पुण्यात ड्रग्स रॅकेट चालू असल्याचे समोर आल्यानंतर पुणे पोलिसांवर मात्र मोठा संशय व्यक्त केला जात होता. त्यानंतर पोलिसांनी नेपाळ बॉर्डर जवळ वाराणसी मधून भूषण पाटील आणि अभिजीत बलकवडे यांना अटक करून पुण्यात कोर्टात हजर करण्यात आलं होतं. नंतर कोर्टाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणांमध्ये नाशिक येथील एका कारखान्यावर मुंबई पोलिसांनी कार्यवाही केली असून यामध्ये 300 कोटी रुपये ड्रग्स जप्त केलं होतं. त्यामुळे यामध्ये मोठा राजकीय लोकांचा हस्तक्षेप आहे किंवा पाठिंबा असल्याची टीकाही होत आहे. त्याचबरोबर पोलीस आणि ससून प्रशासन यांच्यावरसुद्धा मोठी शंका व्यक्त केली आहे.