महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुचाकी चोरणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; 2 लाख 90 हजारांच्या दुचाकी हस्तगत - pune news

पिंपरी-चिंचवडसह खेड परिसरात दुचाकी चोरट्याला भोसरी पोलिसांनी अटक आहे. त्याच्याकडून 2 लाख 90 हजार रुपये किंमतीच्या पाच दुचाकी आणि एक सेंट्रो मोटार जप्त केली आहे. खेड आणि भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच गुन्हे उघड झाले आहेत, अशी माहिती भोसरी पोलिसांनी दिली.

आरोपी अटकेत
आरोपी अटकेत

By

Published : Oct 11, 2020, 2:08 AM IST

पुणे- पिंपरी-चिंचवडसह खेड परिसरात दुचाकी चोरट्याला भोसरी पोलिसांनी अटक आहे. त्याच्याकडून 2 लाख 90 हजार रुपये किंमतीच्या पाच दुचाकी आणि एक सेंट्रो मोटार जप्त केली आहे. खेड आणि भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच गुन्हे उघड झाले आहेत, अशी माहिती भोसरी पोलिसांनी दिली. प्रफुल दत्तात्रय पाचारणे (रा. राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि खेड परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या सराईत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी गणेश हिंगे आणि आशिष गोपी यांना संबंधित आरोपी हा स्मशानभूमी जवळ चोरी केलेली दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर औताडे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी स्मशानभूमी येथे सापळा रचून सराईत आरोपी प्रफुल पाचारणे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता खेड आणि भोसरी परिसरातून दुचाकी आणि सेंट्रो मोटार चोरी केल्याचं कबूल केले आहे. त्याच्याकडून 2 लाख 90 हजारांच्या पाच दुचाकी आणि सेंट्रो मोटार हस्तगत करण्यात आली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर कैलासे, पोलीस कर्मचारी गणेश हिंगे, आशिष गोपी, संतोष महाडीक, सुमीत देवकर यांच्या पथकाने केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details