पिंपरी-चिंचवड:एका भोंदू बाबाने गुप्त धन आणि पुत्र प्राप्तीसाठी उतारा काढण्याच्या बहाण्याने एकाच कुटुंबातील पाच मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडकीस आली. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी संबंधित भोंदू बाबा विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केले आहे. सोमनाथ कैलास चव्हाण (वय-३२ रा. खैरेवाडी जि. रायगड) असे या आरोपीचे नाव आहे. भोंदू बाबावर लैंगिक अत्याचार, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक, नरबळी आणि अमानूष अनिष्ट अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरामध्ये पुत्र प्राप्ती होवू नये म्हणून घरातील प्रत्येक सदस्यावर नात्यातील एका महिलेने करणी केलेली आहे. घराच्या एका खोलीमध्ये सात पेट्या धन, एक सोन्याची घागर, एक गणपतीची मूर्ती असा खजिना आहे. तुमच्या घरातील एका मुलीचा जीव धोक्यात आहे. तुम्हाला पुत्र प्राप्ती होण्यासाठी, गुप्तधन मिळवण्यासाठी आणि मुलीचा जीव वाचवण्यासाठी घरामध्ये तीन उतारे आणि विवस्त्र होऊन पूजा करावी लागेल, असे आरोपी सोमनाथने फिर्यादी कुटुंबाला सांगितले.