महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

#corona effect : भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी बंद

बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर कोरोनामुळे उपाययोजनेसाठी आज सायंकाळी 5 वाजताची आरतीनंतर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे.

By

Published : Mar 17, 2020, 6:47 PM IST

मंदिर समितीचे सदस्य
मंदिर समितीचे सदस्य

पुणे- बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर कोरोनामुळे उपाययोजनेसाठी आज सायंकाळी 5 वाजताची आरतीनंतर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांनी दिली आहे.

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी बंद

भीमाशंकर येथे देशभरात असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना भीमाशंकर देवस्थानच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रशासनाचा पुढील आदेश येईपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे. या काळात भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी विश्वस्त तहसीलदार सुचित्रा आमले यांनी केले आहे.

भीमाशंकर देवस्थान जंगल परिसरात आहे. मात्र, या ठिकाणी असंख्य पर्यटक व भाविक येत असतात. त्यामुळे गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी उपाययोजना म्हणून देवस्थानच्या वतीने निर्णय घेण्यात आला आहे. शासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आले.

हेही वाचा -कोरोना व्हायरस: संसर्ग रोखण्यासाठी तुळशीबाग कडकडीत बंद

ABOUT THE AUTHOR

...view details