महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इतिहासात पहिल्यांदाच भीमाशंकर मंदिर श्रावणात बंद; भाविकांविना परिसर पडला ओस

भीमाशंकर ज्याप्रमाणे तीर्थ क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे तसेच ते एक पर्यटनस्थळ म्हणूनही नावारुपास आले आहे. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा मंदिर परिसर व पर्यटनस्थळी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशानसनाने बंदी आदेश जारी केला आहे. परिणामी श्रावणातल्या पहिल्या सोमवारी भीमाशंकरचा परिसर भाविकांविना सुनसान झाला आहे.

bhimasahankar
भीमाशंकर

By

Published : Jul 27, 2020, 10:41 AM IST

भीमाशंकर(पुणे) - श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवार सर्वात महत्वाचा मानले जातात. आज पहिला श्रावणी सोमवार आहे. मात्र इतिहासात पहिल्यांद्याच कोरोनाच्या महामारीमुळे बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी बंद आहे. त्यामुळे मंदिर परिसर निर्जन दिसून येत आहे. मात्र मंदिर बंद असले तरी श्रावण मासातील शिवलिंगाच्या पूजा नित्यनियमाने पार पाडल्या जात आहेत.

भीमाशंकर
इतिहासात पहिल्यांद्याच भीमाशंकर मंदिर श्रावणात बंद
कोरोना महामारीच्या संकटात भीमाशंकर मंदिर परिसरात कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी 12 मार्चपासून मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. भीमाशंकर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या श्रावण मास सुरू झाला आहे. श्रावण महिन्यात भीमाशंकरच्या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक गर्दी करतात. मात्र, यावर्षी पहिल्यांदाच मंदिर परिसर ओस पडल्याचे चित्र दिसून आले. आज पहिल्या सोमवारी निवडक पाच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पहाटे 4:30 वाजता पूजा करुन मंदिर बंद करण्यात आले.

कोरोनाचा समुह संसर्ग रोखण्यासाठी श्रावण महिन्यात मंदिर बंद ठेवण्यात येत असल्याने भाविकांनी देवस्थान व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन कार्यकारी विश्वस्त तथा तहसीलदार सुचित्रा आमले यांनी केले. भीमाशंकर ज्याप्रमाणे तीर्थ क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे तसेच ते एक पर्यटनस्थळ म्हणूनही नावारुपास आले आहे. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा मंदिर परिसर व पर्यटनस्थळी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशानसनाने बंदी आदेश जारी केला आहे. परिणामी श्रावणातल्या पहिल्या सोमवारी भीमाशंकरचा परिसर भाविकांना सुनसान झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details