पुणे -आयपीएस अधिकारी परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्याचे आदेश कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने दिले आहे. आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी या संदर्भात अर्ज केला. कोरेगाव भीमा हिंसाचार घडला त्यावेळी परमबीर सिंह हे ADG law and order व शुक्ला हे पुणे पोलीस आयुक्त होते.
कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने बजावले परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला यांना समन्स
हिंसाचाराच्या घटनेच्या अनुषंगाने त्यांच्याकडील इंटेलिजन्स इनपुट व इतर माहिती महत्वाची असल्याने, त्यांची साक्ष आवश्यक असल्याचे आशिष सातपुते यांनी म्हटले आहे. सातपुते यांचा अर्ज मंजूर करताना आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती जे एन पटेल यांनी परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला यांना समन्स जारी करण्याचे आदेश दिले आहेत.
परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला

हेही वाचा -अनन्या पांडेच्या व्हाट्सअप चॅटमधील 'त्या दोन' स्टार किड्सच्या शोधात एनसीबी