महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यातील भिडे वाड्याची अवस्था बिकट; सरकारचे दुर्लक्ष - पुण्यातील भिडे वाड्याची अवस्था बिकट

सावित्रीबाई फुलेंनी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यामध्ये १ जानेवारी १८४८ ला मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती. मात्र, हा वाडा मोडकळीस आला आहे. घाण आणि कचऱ्यामुळे वाड्यात पाय ठेवायलाही जागा नाही. वाड्याची सध्याची अवस्था बिकट झाली आहे.

bhide-house-is-budhvarpeth-pune
पुण्यातील भिडे वाड्याची अवस्था बिकट

By

Published : Nov 29, 2019, 3:22 PM IST

पुणे-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी संसदेत करण्यात आली. गुरुवारी महात्मा ज्योतीराव फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत ही मागणी करण्यात आली आहे. एकीकडे ही मागणी होत असताना पुण्यातल्या भिडे वाड्यात सावित्रीबाईंनी देशात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, त्या वाड्याची दुरवस्था झाली आहे.

पुण्यातील भिडे वाड्याची अवस्था बिकट

हेही वाचा-'महाराष्ट्रातील लहान भावाला पंतप्रधानांनी साथ द्यावी'

सावित्रीबाई फुलेंनी पुण्यातीव बुधवार पेठेतील भिडे वाड्यामध्ये १ जानेवारी १८४८ ला मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती. मात्र, हा वाडा मोडकळीस आला आहे. घाण आणि कचऱ्यामुळे वाड्यात पाय ठेवायलाही जागा नाही. वाड्याची सध्याची अवस्था बिकट झाली आहे. हा वाडा एक ऐतिहासिक वास्तू आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. हा वाडा कधीही पडेल अशा अवस्थेत आहे. १५० ते २०० वर्षांपूर्वीचा हा वाडा आहे. या वास्तूचे जतन करण्यासाठी डागडूजी करावी, असे राज्य सरकारला महापालिकेला पत्र दिल आहे. पण सरकारकडून अद्याप काहीच करण्यात आलेले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details