पुणे- ‘ओळख भारताच्या ऐतिहासिक वारशाची’ हा ऑनलाईन अभ्यासक्रम भांडारकर संस्थेमध्ये येत्या 26 एप्रिलपासून सुरू करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे सचिव प्रा. सुधीर वैशंपायन यांनी कळवली आहे. हा अभ्यासक्रम ‘हेरिटेज इंडिया’ आणि ‘न्यानसा’ या संस्थांच्या सहकार्याने होणार असून 26 एप्रिलपासून दररोज सायंकाळी 7 ते 8 या वेळेत गुगल-मीटच्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने घेतला जाणार आहे.
'ओळख भारताच्या ऐतिहासिक वारशाची' ऑनलाईन अभ्यासक्रमाचे भांडारकर संस्थेकडून आयोजन - pune news
सशुल्क असलेल्या या अभ्यासक्रमात 24 व्याख्याने असून यासाठी नोंदणी करण्याचे आवाहनही संस्थेने केले आहे. या व्यापक अभ्यासक्रमात वेद, व्याकरण, वनस्पती शास्त्र, संस्कृती, भाषा, प्राचीन खाद्य संस्कृती अशा विविध पैलूंचा समावेश आहे.
सशुल्क असलेल्या या अभ्यासक्रमात 24 व्याख्याने असून यासाठी नोंदणी करण्याचे आवाहनही संस्थेने केले आहे. या व्यापक अभ्यासक्रमात वेद, व्याकरण, वनस्पती शास्त्र, संस्कृती, भाषा, प्राचीन खाद्य संस्कृती अशा विविध पैलूंचा समावेश आहे. या अभ्यासक्रमाला डॉ. गो. बं. देगलूरकर, डॉ. प्रदीप गोखले, डॉ. सुचेता परांजपे, डॉ. श्रीनंद बापट, डॉ. प्रदीप आपटे, डॉ. मंजिरी भालेराव, डॉ. विजया देशपांडे, डॉ. सचिन पुणेकर, डॉ. अमृता नातू, डॉ. अंबरीश खरे, सुधीर वैशंपायन, डॉ. श्रीकांत कार्लेकर, डॉ. गौरी बेडेकर यासारखे दिग्गज मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत.
संस्थेने भारताच्या समृद्ध वारशाची व्यापकता आणि सद्यस्थितीशी त्याची घालायची सांगड हे दोन उद्देश लक्षात घेऊन हा सर्वसमावेशक अभ्यासक्रम सुरू करायचे ठरविले आहे. अधिक माहितीसाठी 9545117239 किंवा 9922442238 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.