महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भामा-आसखेड धरणग्रस्तांचे तिसऱ्या दिवशीही पाण्यात आंदोलन; जिल्हाधिकारी घेणार बैठक - Farmer protest bhama aaskhed

भामा-आसखेड परिसरातील 18 गावांचे नागरिक महिला लहान मुले गेल्या तीन दिवसांपासून जलाशयाच्या पाण्यात बसून आपल्या हक्काच्या पुनर्वसनासाठी लढा देत आहेत. तीस वर्षापासून या धरणग्रस्तांची तिसरी पिढी आंदोलनात संघर्ष करत आहे.

Farmer protest
भामा-आसखेड धरणग्रस्तांचे तिसऱ्या दिवशीही पाण्यात आंदोलन; जिल्हाधिकारी घेणार बैठक

By

Published : Jun 9, 2020, 2:48 PM IST

पुणे - आमच्या हक्काचे पुनर्वसन झाल्याशिवाय पुण्याच्या जलवाहिनीचे एक किलोमीटर काम बंद करण्याची मागणी करत आज तिसऱ्या दिवशी भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकरी जलाशयाच्या पाण्यात बसून आहेत. धरणग्रस्तांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आज राजगुरुनगर येथे धरणग्रस्तांच्या शिष्टमंडळाची बैठक घेणार आहेत या बैठकीवर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याचे धरणग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले.

भामा-आसखेड परिसरातील 18 गावांचे नागरिक महिला लहान मुले गेल्या तीन दिवसांपासून जलाशयाच्या पाण्यात बसून आपल्या हक्काच्या पुनर्वसनासाठी लढा देत आहेत. तीस वर्षापासून या धरणग्रस्तांची तिसरी पिढी आंदोलनात संघर्ष करत आहे. मात्र, या धरणग्रस्तांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत लेखी आश्वासनेही पाळत नाही. त्यामुळे विश्वास तरी ठेवायचा कुणावर? अशा सवाल हे आंदोलक करत आहेत.

भामा-आसखेड धरणग्रस्तांचे जलसमाधी आंदोलन तीव्र होत असताना, जिल्हाधिकारी नवल किशोर राव आंदोलकांशी बैठकीतून चर्चा करणार आहेत. धरणग्रस्त शेतकरी जलसमाधी आंदोलनावर ठाम.आहेत. आज तिसऱ्या दिवशी भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकरी जलाशयाच्या पाण्यात कुटुंबासह बसून आंदोलन करत आहेत. पुनर्वसन होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार असल्याचे धरणग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details