पुणे - भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकरी पुनर्वसनासाच्या मागणीसाठी रविवारपासून जलाशयात उतरुन आंदोलन करीत आहेत. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. लहान मुले, वयोवृद्ध नागरिक महिला तरुण यांचाही यात समावेश आहे. 'जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही जलाशयातून बाहेर पडणार नसून वेळ पडली तर जलसमाधीही घेऊ' अशा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
भामा-आसखेड धरण : शेतकऱ्यांचे पुनर्वसनासाठी जलाशयात उतरुन आंदोलन
शेतकऱ्यांच्या जीवापेक्षा शासनाला जलवाहिनीचे काम महत्वाचे वाटेत असेल आणि जलवाहिनीचे काम बंद होणर नसेल तर आम्ही देखील आमच्या भुमिकेवर ठाम आहोत. संपुर्ण कुटुंबासह याच भामा-आसखेड जलाशयात जलसमाधी घेऊ अशा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या जीवापेक्षा शासनाला जलवाहिनीचे काम महत्वाचे वाटेत असेल, आणि जलवाहिनीचे काम बंद होणार नसेल तर आम्ही देखील आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. संपुर्ण कुटुंबासह याच भामा-आसखेड जलाशयात जलसमाधी घेऊ, अशा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे.
पुनर्वसनासाठी एका धरणग्रस्त शेतकऱ्याने याच धरणात मागील वर्षी जलसमाधी घेतली होती. त्यावेळी त्या शेतकऱ्याचे तत्काळ पुनर्वसन करण्यात आले. जीव गेल्यावरच शासन पुनर्वसन करणार असेल तर एक प्रकारे धरणग्रस्त शेतकऱ्यांनी कुटुंबासह धरणाच्या जलाशयात उतरुन रणशिंग फुंकले आहे.
जलाशयाच्या 18 गावांना पोलिसांचा बंदोबस्त...
भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकरी कुटुंबासह रविवारपासून जलाशयाच्या पाण्यात उतरले आहेत. त्यांनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले असून पोलीसांची तगडी फौज धरणग्रस्तांवर नजर ठेवण्यासाठी तैनात आहे.