महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पैसा नको.. जमिनीला जमीन द्या! अन्यथा जलसमाधी

पुण्याला जाणाऱ्या जलवाहिनीचे एक किलोमीटरचे काम पुनर्वसन पुर्ण झाल्यानंतर केले जाईल, असे लेखी आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. तरीही जिल्हा प्रशासनाकडुन पोलीस बंदोबस्तात जलवाहिनीचे काम दोन दिवसापासुन सुरू करण्यात आले. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.

पैसा नको.. जमिनीला जमीन द्या! अन्यथा जलसमाधी
पैसा नको.. जमिनीला जमीन द्या! अन्यथा जलसमाधी

By

Published : Aug 19, 2020, 6:58 PM IST

(राजगुरुनगर)पुणे - पैसा नको.. जमिनीला जमीन द्या, म्हणत भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकरी आक्रमक झाले आहेत. या मागणीसाठी प्रकलग्रस्त शेतकऱ्यांनी आज(बुधवारी)कुटुंबासह भामा-आसखेड धरणाच्या पाणी पात्रात जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे भामा-आसखेड धरणग्रस्तांचे आंदोलन चिघळले आहे.

पुणे शहरासाठी जाणाऱ्या जलवाहिनीचे एक किलोमीटरचे काम पुनर्वसन पुर्ण झाल्यानंतर केले जाईल, असे लेखी आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. तरीही जिल्हा प्रशासनाकडुन पोलीस बंदोबस्तात जलवाहिनीचे काम दोन दिवसापासुन सुरू करण्यात आले. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.

'आमच्या हक्काचे पहिलं पुनर्वसन करा मगच जलवाहिनीचे काम करावे, अन्यथा आमरण उपोषण करुन धरणाच्या पाणीपात्रात जलसमाधी घेऊ'; असा इशारा देत आज दुपारी धरणग्रस्त शेतकरी महिला मुलाबाळांसह पाणी पात्रात उतरले आहेत. या जवाहिनीच्या विरोधात भामा-आसखेड धरणग्रस्त 23 गावांतील धरणग्रस्त सहभागी झाले आहे.

भामा-आसखेड धरणग्रस्तांना जमिनीला जमीन द्या, असा न्यायालयाने आदेश दिला आहे. तरीही धरणग्रस्तांचे पुनर्वसन होत नाही, तसेच पात्र व अपात्र धरणग्रस्तांनाही योग्य मोबादलाही दिला जात नाही, तरीही पुण्याला पाणी देण्यासाठी प्रशासन आग्रही आहे. त्यामुळे पहिलं पुनर्वसन मग पुण्याला पाणी, असा पवित्रा आता धरणग्रस्तांनी घेतला आहे. दरम्यान आंदोलक पाण्यात उतरल्याने या ठिकाणी मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details