पुणे - शेतकऱ्यांसाठी अतियश उपयुक्त प्राणी म्हणून बैल ओळखला जातो. बैलपोळ्याच्या दिवशी शेतकरी आपल्या बैलाच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. भाद्रपद अमावस्येला बैलांना सजवून त्यांना गोडधोड खाऊ घालून गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.
उत्तर पुणे भागात भाद्रपद बैलपोळा साजरा उत्तर पुण्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये बैलपोळा सण साजरा होतो. मात्र, या वर्षी दुष्काळी परिस्थिती व अवकाळी पाऊस, शेतीचे होणारे नुकसान यामुळे या बैलपोळा सणावर दुष्काळाचे सावट आहे. त्यातूनही शेतकऱ्यांनी बैलांना सजवून पोळ्यानिमित्त त्यांची मिरवणूक काढत बैलपोळा साजरा केला. हेही वाचा -पुणे: महाळुंगे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना 3 लाखांची लाच घेतांना अटक
उत्तर पुणे भागातील गावागावांत प्रथेनुसार वेशीमध्ये सर्व परिसरातील बैल एकत्र आणण्यात आले. नंतर मानाच्या बैलांकडून नारळ फोडण्यात आले. त्यानंतर पोळा फुटला व मिरवणुका काढण्यात आल्या. वर्षभर शेतात काम करणाऱ्या बैलांना बैलपोळ्याच्या दिवशी कामास जुंपत नाहीत व शेताचे कोणतेच काम करवून घेतले जात नाही. सकाळी बैलांना आंघोळ घालण्यात आली. नंतर येंगूळ व बेगड, फुले, बाशिंग बांधून त्यांना सजवण्यात आले. सायंकाळी वाजतगाजत, ढोल ताशाच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत बैलांची मिरवणूक काढण्यात आली.
हेही वाचा -अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर पिंपरी-चिंचवडमधून नगरसेवक पदाचा राजीनामा
बैल पुन्हा घरी आल्यावर सुवासिनींनी त्यांना ओवाळून पुरणाची पोळी खाण्यास दिली. बैलपोळ्याच्या दिवशी अगोदर आपल्या लाडक्या बैलांना गोड-धोड घातल्यानंतर घरातील मंडळींनी जेवण केले.