पुणे - जुन्नर तालुक्यातील खोडद येथील दुर्बीण प्रकल्पात विज्ञान प्रदर्शनाला गुरुवारी रात्रीपासून सुरुवात झाली. या प्रदर्शनात अनेकांनी आकाशदर्शनाचा अनुभव घेताल.
खोडद येथील दुर्बीण प्रकल्पात विज्ञान प्रदर्शनाला सुरुवात - विज्ञान प्रदर्शन
पुण्यातील खगोल विश्व या संस्थेच्या वतीने यासाठी ४ दुर्बिणींची सोय करण्यात आली होती. महाराष्ट्रातील खगोल प्रेमींनी यासाठी गर्दी केली होती.

खोडद येथील दुर्बीण प्रकल्पात विज्ञान प्रदर्शनाला सुरुवात
खोडद दुर्बीण प्रकल्पात विज्ञान दिनाचे औचित्य साधून गुरुवारी रात्री खास खगोलप्रेमींसाठी आकाश दर्शन करण्याची नामी संधी उपलब्ध करण्यात आली होती.पुण्यातील खगोल विश्व या संस्थेच्या वतीने यासाठी ४ दुर्बिणींची सोय करण्यात आली होती. महाराष्ट्रातील खगोल प्रेमींनी यासाठी गर्दी केली होती. मागच्या २० वर्षांपासून ही संस्था खगोलप्रेमींसाठी हे काम करत आहे. राशी, नक्षत्र, ग्रह, तारे, या निमित्ताने जवळून पाहता येत आहेत. यावेळी खगोलप्रेमींनी रात्रीच्या अंधारात आकाश निरीक्षणाचा आनंद घेतला.
खोडद येथील दुर्बीण प्रकल्पात विज्ञान प्रदर्शनाला सुरुवात