महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रहार संघटनेच्यावतीने दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी भीक मांगो आंदोलन - Prahar organization, Pune

ज्यांना दोन हात, दोन डोळे नाही, मतिमंद, अतितीव्र अपंग अश्या अपंगांच्या इतर प्रवर्गासाठी सरकारने मदत करावी, अशा विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्यावतीने भीक मांगो आंदोलन करण्यात आले आहे.

प्रहार संघटनेचे भीक मांगो आंदोलन
प्रहार संघटनेचे भीक मांगो आंदोलन

By

Published : May 28, 2021, 11:10 AM IST

पुणे- गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रातील दिव्यांग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. लॉकडाऊनमुळे सर्व बंद असल्याने घरातच बसावे लागत आहे. रोजगार, उदयोगधंदे बुडाल्यामुळे उपजिविकेचे दुसरे साधन नसल्यामुळे दिव्यांगांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. घराचे भाडे, दुकानाचे भाडे, घरासाठी, दुकानासाठी काढलेले कर्ज फेडणे कठीण झाले आहे. मुलांच्या शिक्षणाची फी न भरल्याने ऑनलाईन शिक्षण देखील बंद झाले आहे. सरकारने सर्वांना मदत केली पण दिव्यांगाना मदत जाहीर न झाल्याने, आज प्रहार संघटनेच्यावतीने दिव्यांग कार्यालयाजवळ भीक मांगो आंदोलन करण्यात आले आहे.

प्रहार संघटनेच्यावतीने दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी भीक मांगो आंदोलन

'सर्व घटकांना मदत पण आम्हाला अजूनही काहीच मदत नाही'

सरकारने लॉकडाऊन मध्ये कामगार, मजूर, रिक्षावाले, फेरीवाले व इतर वर्गासाठी विशेष मदत जाहिर केली. परंतु ज्यांना दोन हात, दोन डोळे नाही, मतिमंद, अतितीव्र अपंग अश्या अपंगांच्या इतर प्रवर्गासाठी सरकारने नव्याने अशी कुठलीच मदत दिलेली नाही. दिव्यांग हा सुद्धा समाजाचा घटक आहे, बहुधा सरकार हे विसरले आहे. म्हणून आज आम्ही भीक मागून आंदोलन करत आहोत, असे प्रहार संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

दिव्यांगांसाठी विविध मागण्या

'अन्यथा तीव्र आंदोलन करु'

कोरोना महामारीत आपत्तीत सापडलेल्या महाराष्ट्रातील लाखो दिव्यांग व्यक्तींवर भिक मागण्याची परस्थिती निर्माण झालेली आहे. दिव्यांगांच्या परस्थितीची सरकारला जाणीव करून देण्यासाठी व महाराष्ट्रातील दिव्यंगासाठी सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करावे, या मागणीसाठी आज दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालयासमोर प्रहार संघटनेच्या वतीने भीक मांगो आंदोलन करण्यात आले आहे. सरकारने लवकरात लवकर जर आमची मागणी मान्य नाही केली, तर आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.

हेही वाचा -ठरलं ! नववी आणि दहावीच्या आंतरीक गुणांच्या आधारावर विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणार

ABOUT THE AUTHOR

...view details