पुणे- राजगड ते तोरणा ट्रेक करत तोरणा किल्ल्यावर दाखल झालेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 25 पर्यटक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
तोरणा किल्ल्यावर मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला, 25 जण जखमी - तोरणा किल्ला पुणे
30 पर्यटकांचा 1 गट राजगड ते तोरणा ट्रेक करत आज सायंकाळी तोरणा किल्ल्यावर दाखल झाला होता. तोरणा किल्यावरील बुधला माचीजवळ हे पर्यटक आले असता, मधमाशांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला.
तोरणा किल्ल्यावर मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला
हेही वाचा - पुणे जिल्ह्यात एटीएमची सुरक्षा रामभरोसे
याप्रकरणी प्राथमिक माहिती अशी की, 30 पर्यटकांचा 1 गट राजगड ते तोरणा ट्रेक करत आज सायंकाळी तोरणा किल्ल्यावर दाखल झाला होता. तोरणा किल्यावरील बुधला माचीजवळ हे पर्यटक आले असता, मधमाशांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. यात जवळपास 25 पर्यटक जखमी झाले आहेत.