बारामती ( पुणे ) -विविध राज्यातील खासदारांचे आज बारामती येथे आगमन झाले. त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ( BJP MP meet Sharad Pawar ) भेट घेतली. खासदारांचा बारामती दौरा वैयक्तिक स्वरूपाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र विशेष म्हणजे या खासदारांमध्ये भाजपचे 5 खासदारही उपस्थित राहिले आहेत.
सर्व खासदारांचे आज सकाळी बारामती विमानतळावर आगमन ( MPs arrived at Baramati Airport ) झाले. एकूण 19 खास लोकांचा हा दौरा आहे. यामध्ये 12 खासदार आणि काही उद्योगपतींचाही ( BJP MP in Baramati ) समावेश आहे. हे सर्व खासदार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( NCP president Sharad Pawar ) , उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy CM Ajit Pawar ) , खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule ) आणि पवार कुटुंबीय बारामती व परिसरात झालेल्या विकासकामांचा आढावा घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा-Sadabhau Khot Threat call : एसटी संपावरून सदाभाऊ खोत यांना धमकीचा फोन
2 दिवस पवार कुटुंबीयांचा घेणार खास पाहुणचार
आज सकाळी विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर या सर्व पाहुण्यांनी प्रथम लक्झरी बसमधून फेरेरो या आंतरराष्ट्रीय चॉकलेट कंपनीला भेट दिली. त्यानंतर त्यांनी बारामतीत महिलांनी बांधलेल्या टेक्सटाईल पार्कला भेट देऊन तेथील महिलांशी संवाद साधला. त्यांनी या काळात येथील शिक्षण संकुल विद्या प्रतिष्ठानला भेट दिली. पाहुण्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे व आमदार रोहित पवार हे विकासकामांची माहिती देत होते. हे 12 खासदार आणि काही उद्योगपती 2 दिवस पवार कुटुंबीयांचा खास पाहुणचार घेणार आहेत.
हेही वाचा-Kirit Somaiya protest : किरीट सोमैय्या यांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन