पुणे -बारामती येथील सिल्वर जुबली शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील 'एआरटी' विभाग एड्स ग्रस्त रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे. या विभागाने मागील पाच वर्षांत तब्बल २० हजारांहून अधिक नागरिकांची एचआयव्ही तपासणी केली आहे. यामध्ये ७३२ जण एचआयव्ही बाधित आढळून आले आहेत. तसेच, २०१८ ते २०२१ मध्ये १३ बाधित बालकांना उपचाराअंती बरे केले आहे.
हेही वाचा -Etv Bharat Special : हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूदर कमी करणारे कार्डियाक किट
काय आहे एचआयव्ही?
एचआयव्ही म्हणजे 'ह्यूमन इम्युनोडेफिशियन्शी व्हायरस' होय. हा व्हायरस व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी करतो. एचआयव्ही बाधिताची हेळसांड न करता कॉलरा, मलेरिया, कर्करोग, क्षयरोग आदी आजारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांकडे आपण जसे बघतो तसाच दृष्टिकोण एचआयव्ही बाधित रुग्णांकडे ठेवणे गरजेचे आहे.
बारामती शासकीय उपजिल्हा रुग्णालयात असणाऱ्या 'एआरटी' विभागात बारामतीसह पुरंदर, इंदापूर, बार्शी, सोलापूर, दौंड, भोर, शिरूर, करमाळा, माळशिरस आदी भागांतील रुग्ण उपचारासाठी येतात. या ठिकाणी रुग्णांवर सर्व प्रकारचे मोफत उपचार केले जातात. एक्स - रे, लॅब तपासण्या, सोनोग्राफी, आवश्यक औषधे विनामुल्य दिले जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, 'एआरटी' विभागाकडून बाधित रुग्णांवर उपचारांबरोबरच त्यांचे मनोबल वाढविण्याचे कामही केले जाते. त्यामुळे, हा विभाग एचआयव्ही बाधित रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे.
कोरोना काळातही एचआयव्ही बाधित रुग्ण औषध उपचारांपासून वंचित राहणार नाही, यासाठी 'एआरटी' विभाग नियमित सुरू होता. शिवाय बहुतांशी बाधित रुग्णांना कोरोना लसीकरणही करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. या रुग्णालयात एचआयव्ही बाधित रुग्णांसाठी असणाऱ्या विभागात वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवती संत, समुपदेशक संदीप राऊत, औषध उपचारतज्ज्ञ मनीषा माने, प्रयोग तज्ज्ञ रुपाली डेंगले, माहिती व्यवस्थापक अभिजीत पवार, परिचारिका सुप्रिया पवार आदींकडून योग्य उपचार केले जातात.
सिल्वर जुबली शासकीय उपजिल्हा रुग्णालय हे कोविड रुग्णालय असल्याने हे केंद्र वर्षभरापासून महिला रुग्णालय बारामती येथे चालवत असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सदानंद काळे यांनी दिली.
बाधित रुग्णांसाठी या आहेत योजना
- संजय गांधी निराधार योजना
- अंत्योदय योजना