पुणे - शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बारामतीच्या सतीश ननवरे यांनी तिरुपती बालाजी ते बारामती हे 1 हजार 100 कि. मी. चे अंतर फक्त 55 तासांत सायकलवर पूर्ण केले आहे. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे बारामतीत मोठी चर्चा आहे.
तिरुपती ते बारामती ५५ तासात सायकलवरुन प्रवास, शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्याच्या अनोखा उपक्रम - शरद पवारांचा वाढदिवस
तिरुपती ते बारामती हे 1100 कि. मी. चे अंतर फक्त 55 तासांत सतीश ननवरे यांनी सायकलवर पूर्ण केले आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी हा साहसी उपक्रम केला.
शरद पवार यांच्या 79 व्या वाढदिवसानिमित्त या लढवय्या नेतृत्वाला शुभेच्छा देण्यासाठी बारामतीचा पहिला आयर्नमॅन सतीश ननवरे यांनी तिरुपती बालाजी ते बारामती हा 1 हजार 100 किलोमीटरचा प्रवास फक्त 55 तासांमध्ये सायकलवर पूर्ण केला आहे.
सतीश ननवरे यांना तिसऱ्यांदा आयर्नमॅन होण्याचा बहुमान ऑस्ट्रेलिया येथे 1 डिसेंबरला मिळाला. त्यानंतर त्यांनी 6 डिसेंबरला बारामतीला येऊन लगेच 8 तारखेला बालाजीला निर्गमन केले. 10 डिसेंबरला सकाळी बालाजीवरून निघाले आणि शरद पवारांच्या वाढदिवसादिवशी 12 तारखेला सायंकाळी 5 वाजता बारामतीत पोहोचले. इतक्या मोठ्या स्पर्धेत यश मिळवल्यानंतर किंचितही विश्रांती न घेता तिरुपती ते बारामती हे 1 हजार 100 किलोमीटरचे अंतर फक्त 55 तासांत सायकलवर पूर्ण केले आहे.