बारामती - येथील एमआयडीसी परिसरातून चोरीला गेलेल्या केबलचा बारामती तालुका पोलिसांनी अवघ्या पाच तासांत छडा लावला आहे. दोन आरोपींना ताब्यात घेऊन २ लाख १० हजार ४० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
२ लाख १० हजार ४० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत -
बारामती तालुका पोलीस ठाणे हददीतून (दि.१४/१५ जून ) दरम्यान बारामती एम.आय.डी.सी. परिसरातुन पॉलीकॅब कंपनीची ५००० मीटर केबल चोरी गेल्याची तक्रार दाखल होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून अवघ्या पाच तासात राजु सलीम गायकवाड (वय.२४ वर्षे रा प्रबुध्दनगर आमराई ता.बारामती), संग्राम उर्फ झिंगाट हनुमंत साळुखे (वय.२० वर्षे रा आमराई ता.बारामती), यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसुन चौकशी केली असता त्यांनी केबलची चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींनी एम.आय.डी.सी. परिसरातून चोरलेली १० पोलीकॅब कंपनीचे केबलचे बंडल ५००० मीटर असलेली केबल असा एकुण २ लाख १० हजार ४० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगीरी गुन्हे शोध पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, महेश विधाते, पो.हवालदार बंडगर, पोलीस अंमलदार राहुल पांढरे, नंदु जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, मंगेश कांबळे यांनी केली आहे.
हेही वाचा - ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : 24 तासाच्या आत रोटी घाटात उखडलेल्या मार्गाचे काम सुरू