पुणे - सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून कोरोना बाधित रुग्णाची ओळख जाहीर केल्याप्रकरणी बारामतीमध्ये तीन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक एप्रिलला समाजात भीती निर्माण होईल अशा प्रकारचा मजकूर सोशल मीडियावर न टाकण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले होते. मात्र, तरीही या तरुणांनी हा प्रकार केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
सोशल मीडियावर कोरोनाबाधिताची ओळख जाहीर करणे पडले महागात - Corona Outbreak
कोरोनाबाधित रुग्णाची ओळख जाहीर केल्याप्रकरणी बारामतीमध्ये तीन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. योगेश अरविंद शिरसट (रा.गुणवडी ता.बारामती) अनुप सुरेश देशमाने (रा.भोईगल्ली बारामती) आणि सागर राजेंद्र पलंगे (रा.खाटीकगल्ली बारामती ) अशा या आरोपींची नावे आहेत.
योगेश अरविंद शिरसट (रा.गुणवडी ता.बारामती) अनुप सुरेश देशमाने (रा.भोईगल्ली बारामती) आणि सागर राजेंद्र पलंगे (रा.खाटीकगल्ली बारामती ) अशा या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक पांडुरंग गोरवे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
29 मार्चला योगेश शिरसट याने व्हॉट्सअॅप ग्रुपवर सात जणांचा एकत्रित असलेला फोटो टाकला होता. त्या फोटोतील एकाच्या चित्रावर गोल मार्किंग करत ती व्यक्ती कोरोनाबाधीत असल्याचे जाहीर केले. तसेच या रुग्णाच्या परिसराचा उल्लेख करून त्याच परिसरात आणखी दोन रुग्ण आढळल्याचा मजकूर व्हायरल केला. त्यामुळे व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार अमोल खाडे करत आहेत.