बारामती- कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बापदेव घाटात लुबाडणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. घाटात असणाऱ्या एका हॉटेल जवळ ३ मोटर सायकलवरून आलेल्या आठ जणांनी एकाला रस्त्यावर अडवून त्याची सॅक व त्यातील १ लाख ३० हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने चोरून नेले. सदर घटना २९ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हेही वाचा - फायजर बायोटेक : इंग्लंडमध्ये पुढील आठवड्यात लस होणार उपलब्ध, सरकारची मंजूरी
बापदेव घाटात लुटणाऱ्यांना बारामती पोलिसांनी केली अटक
कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बापदेव घाटात लुटमार झाल्याची घटना २९ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत पोलिसांनी दुचाकीसह काही जणांवर कारवाई करीत अटक केली आहे.
या घटनेची हकीकत अशी की, बापदेव घाटात २९ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तीन मोटरसायकलवरुन आलेल्या आठ जणांनी एका इसमाला रस्त्यात अडवून त्यास मारहाण करून त्याची १ लाख ३० हजार रुपयांची रक्कम बळजबरीने चोरून नेल्याची माहिती वायरलेस वरून पुणे पोलिसांकडून बारामती शहर पोलिसांना कळविण्यात आली होती. त्यानुसार बारामती हद्दीत १ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास बारामती येथील फलटण चौकात एक लाल काळया रंगाची मोटरसायकल (१२१२), तसेच पल्सर मोटरसायकल (एम एच १२ ए. झेड.३५६०) यावर रोहित सुरेश बाबर( वय २१.रा. महात्मा फुले सोसायटी सासवड ता. पुरंदर), राजेश सिताराम निघोल( वय २२ राहणार दत्तनगर सासवड ता. पुरंदर) हे दोघे मिळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना पोलिस ठाण्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांचे इतर साथीदार चेतन उर्फ भैय्या वैराग, सनी मिसाळ, जगन्नाथ दत्ता वाघमारे (सर्व रा.महात्मा फुले सोसायटी सासवड ता.पुरंदर जि.पुणे) यांनी मिळून बापदेव घाट केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. व जबरीने काढून घेतलेले १ लाख ३० हजार रुपये वाटून घेऊन ते खर्च केल्याचे सांगितले.सदर आरोपींना पुढील तपासकामी कोंढवा पोलीस ठाणे पुणे शहर यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे.
हेही वाचा - इंडोनेशियात कोरोनाच्या संसर्गाने 180 डॉक्टरांचा मृत्यू