पुणे - बेकायदेशीरपणे गावठी दारू बनविणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या 8 अड्ड्यांवर रविवारी बारामती पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत 1 लाख 63 हजार 209 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
बेकायदेशीर गावठी दारू विक्री करणाऱ्यांवर बारामती पोलिसांची कारवाई हेही वाचा - माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षांच्या विरोधात आर्थिक अपहरणाचा गुन्हा दाखल
यासंदर्भात आलेल्या तक्रारीवरून जयंत मीना अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग यांच्या आदेशावरून तालुक्याच्या हद्दीत बेकादेशीर गावठी दारू, हातभट्टी तयार करणाऱ्यांवर आणि त्याची विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत बारामती शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पिंपळी, शेंडे वस्ती आणि गुणवडी या भागांमध्ये एकूण 1 लाख 8 हजार 100 रुपयांची गावठी दारू जप्त करून जागीच नष्ट करण्यात आली. त्यामध्ये एकूण 22 बॅरेल कच्चे रसायन आणि इतर मुद्देमाल जागीच नष्ठ करण्यात आला. तसेच बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत घाडगेवाडी आणि सांगवी या भागात एकूण 55 हजार 100 रुपयांची गावठी दारू जप्त करून जागीच नष्ट करण्यात आली. त्यामध्ये एकूण 15 बॅरेल कच्चे रसायन आणि इतर मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला. या कारवाईमध्ये एकूण 1 लाख 63 हजार 209 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला.
हेही वाचा - कसा का होईना पण मी चारवेळा उपमुख्यमंत्री - अजित पवार
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, चालक सतीश मोरे, आरसीपी पथकातील 6 पोलीस जवान यांनी केली.