पुणे - बारामतीतील शारदानगर येथील कृषी विज्ञान केंद्रात होणार कृषिक प्रदर्शनाची गुरुवारी (ता. १६) सुरुवात होत आहे. चार दिवस सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बारामती 'कृषिक' प्रदर्शनाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार उद्घाटन... हेही वाचा... उदयनराजे यांना भाजपसमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही - नवाब मलिक
मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा बारामतीतील हा पहिलाच जाहीर कार्यक्रम होत आहे. विशेष म्हणजे, पवार कुटुंब चालवत असलेल्या अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनात उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
हेही वाचा... राज्यात आता 'गाव तिथे काँग्रेस' अभियान
16 जानेवारीला सकाळी 9 वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी ठाकरे हे बारामतीतील अद्ययावत शेती तंत्राची तसेच शेतीसाठी नवीन तंत्राचा अवलंब केलेल्या शेती प्रात्यक्षिकांची पाहणी करणार आहेत. हे प्रदर्शन 19 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कृषीमंत्री दादा भुसे, पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार सुप्रिया सुळे, इस्राईलचे राजदूत व आंतरराष्ट्रीय धोरण सल्लागार डॅन अलुफ या प्रदर्शनाच्या उदघाटनास उपस्थित राहणार आहेत.