पुणे - बारामतीत तब्बल दोन महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज बाजार समितीच्या जळोची येथील भाजीबाजार सुरू झाला. बाजारात पहिल्याच दिवशी ३० क्विंटल फळे, १०१ क्विंटल फळभाज्या तसेच ७००० फळभाज्यांच्या पेंडी शेतीमालाची आवक झाली. बाजार सुरू झाल्याने शेतकरी व विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.
बारामतीतील जळोची उपबाजार सुरू, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन - latest lockdown news of baramati
बारामतीत तब्बल दोन महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज बाजार समितीच्या जळोची येथील भाजीबाजार सुरू झाला. बाजारात पहिल्याच दिवशी ३० क्विंटल फळे, १०१ क्विंटल फळभाज्या तसेच ७००० फळभाज्यांच्या पेंडी शेतीमालाची आवक झाली. यावेळी लिलावादरम्यान बाजारात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यात आले.
बारामतीतील जळोची उपबाजार सुरू
लॉकडाऊनमध्ये वाहतूकव्यवस्था बंद असल्याने तसेच मध्यंतरी पालेभाज्यांबाबत पसरवलेल्या अफवांमुळे भाजीबाजार बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे, शेतकऱ्यांसह नागरिक चिंतेत होते.
बाजारात आज तब्बल ६ हजार कोथींबिरीच्या जुडीची आवक झाली. तसेच मेथी, पालक, शापूच्या १ हजार ४०० जुडी तर बटाटा १७० क्विंटल, कांदा ९३ क्विंटल व फळे ३० क्विंटल इतकी आवक झाली. यावेळी लिलावादरम्यान बाजारात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यात आले. तसेच सॅनिटायझरचा वापरही करण्यात आला.