बारामती Baramati Crime News : ३६ वर्षीय महिलेवर बलात्कार करत तिच्याकडून वेळोवेळी सव्वालाख रुपये उकळल्याची घटना बारामती तालुक्यात घडली आहे. दरम्यान, याप्रकरणी बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी महेश नवनाथ दंडवते याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. तसंच या घटनेत महेशच्या आईनं त्याला साहाय्य केल्यामुळं तिला ही या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आलंय.
काय आहे प्रकरण? :पीडीतेनं केलेल्या तक्रारीनुसार, आरोपीनं ऑक्टोबर २०२० ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत तिच्याकडून १७ हजार रुपये उसने घेतले होते. ते मागितल्यावर आरोपीनं अनैतिक संबंधांबाबत पतीस सांगण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडितेला ब्लॅकमेल करून आरोपीनं आणि त्याच्या आईनं सव्वा लाख रुपये उकळले. तसंच आरोपीनं शेतात नेऊन पीडितेवर वेळोवेळी शारीरिक जबरदस्ती केली. तिचे नग्न फोटो व सेल्फी काढले. तसंच पीडितेशी झालेल्या बोलण्याचे रेकॉर्डिंग तिच्या पतीस ऐकवून त्याला ब्लॅकमेल करत पन्नास हजारांची मागणी केली.
सतत अत्याचार केल्याची पोलिसात तक्रार-पीडितेच्या तक्रारीनुसार जून २०२१ मध्ये ती शेतामध्ये गवत आणण्यासाठी गेली असताना आरोपीनं दोघांचे फोटो नवऱ्याला दाखवतो, असे सांगत तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर वारंवार तो तिला या पद्धतीने धमकी देत तिच्यावर शारीरिक अत्याचार करत राहिला. एप्रिल २०२३ मध्ये त्याने घरासमोर येत, तू आता लगेच माझ्यासोबत चल. नाहीतर मी तुझे नाव छातीवर गोंदले आहे, ते तुझ्या मुलाला दाखवतो, अशी धमकी दिली. त्या भीतीपोटी महिला त्याच्यासोबत गेली. त्यानंतर तो कधी मुलाला तर कधी भावाला घटना सांगतो असे म्हणत तिच्यावर अत्याचार करू लागला.
पोलिसांत गुन्हा दाखल : बुधवारी (दि. ११) पीडित महिला शेतात गेली असता आरोपीची आई तेथे आली. तेव्हा तिनं आम्ही सव्वालाख रुपये पतपेढीतून काढले आहेत, ते भर, अशी मागणी पीडितेकडं केली. पण पीडितेनं नकार दिल्यावर गुरुवारी (दि. १२) महेश आला. तू पतपेढीचे पैसे भरले नाही तर तुझ्या पतीला सगळं सांगेन, अशी धमकी त्यानं दिली. त्याच्या या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेनं आपल्या पतीला सगळी घटना सांगितली. त्यानंतर तिच्या पतीनं महेशला बोलावून घेतलं. आरोपीनं मोबाईलचे मेमरी कार्ड आणत त्यातील रेकाॅर्डिंग तिच्या पतीला ऐकवली. त्यापोटी त्याच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यांनी ते देण्याची तयारी दाखवल्यावर त्याने मेमरी कार्ड तोडून टाकले. त्यानंतर महिलेने या प्रकरणी पोलिसांत धाव घेत फिर्याद दाखल केली. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार या प्रकरणी तपास करीत आहेत.
हेही वाचा -
- Pune News: धक्कादायक...माजी मंत्र्यांविरोधात पुण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल
- Woman Rape Case Pune : लग्न आणि नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार; 2 वर्षानंतर गुन्हा दाखल
- Pune Rape : 50 वर्षीय महिलेवर सलग तीन वर्षे बलात्कार ; कोथरूडच्या सीएला ठोकल्या बेड्या