महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Baramati Crime News : सुपारी देऊन पोटच्या मुलाचा केला खून; वयोवृद्ध मजूर दाम्पत्यासह पाच जणांना अटक - पोपट भानुदास बाराते

Baramati Crime News: बारामती तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. दारु पिऊन त्रास देणाऱ्या पोटच्या मुलाचा वयोवृध्द मजुर दांपत्याने सुपारी देऊन खून केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी मजुर दांपत्य, सुपारी घेवून खून करणाऱ्या तीन जणांना बारामती तालुका पोलीसांनी अटक केली आहे.

Baramati Crime News
मुलाचा सुपारी देऊन केला खून

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 1:38 PM IST

बारामती :Baramati Crime News : २६ मे रोजी एका ३० ते ४० वयोगटातील अनोळखी युवकाचा खून करुन त्याचा मृतदेह रस्सी व तारेने मोठ्या दगडाला बांधून तालुक्यातील शिर्सुफळ येथील तलावात फेकून दिला होता. त्यानंतर तालुका पोलीसांचे तपास पथक हे आजुबाजुच्या गावात तपास करीत होते. याच दरम्यान पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत दौंड तालुक्यातील रावणगाव येथील कुटंबाबाबत माहिती मिळाली. पोपट भानुदास बाराते, त्यांची पत्नी मुक्ताबाई पोपट बाराते व मुलगा सौरभ पोपट बाराते हे गावातून गेल्या ३ महीन्यापुर्वी अचानक गायब झाले होते. त्यानंतर १५ दिवसांनी केवळ बाराते दांपत्यच गावातील घरी परत आले. मात्र, मुलगा सौरभ हा त्यांचा सोबत आला नसल्याची माहीती माेरे यांना मिळाली.


दारु पिवून दांपत्याला मारहाण: पोलीसांनी शुक्रवारी ( दि ३१) पोपट बाराते याच्याकडे मुलगा सौरभ व पत्नी मुक्ताबाई यांच्या ठावठिकाण्याबाबत विचारणा केली. यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मला काही माहीत नाही. माझ्या पत्नीला विचारा असे सांगीतले. त्यावर पोलीसांनी बाराते दांपत्याची मुलगी निलम खुरंगे हीच्याकडे गेलेल्या मुक्ताबाई बारातेचा शोध घेतला. यावेळी मुक्ताबाईने पोलीसांनी केलेल्या चाैकशीत मुलगा सौरभ दारु पिऊन मारहाण करत होता, असे सांगितले.

ठार मारण्यासाठी दिली सुपारी : याप्रकरणी मजुर दांपत्य गावातील बबलु तानाजी पवार याला मुलगा सौरभला जिवे ठार मारण्यासाठी १ लाख ७५ हजार रुपयेची सुपारी दिली होती. (parents give contract to murder son ) त्यानुसार बबलु याने त्याचे मित्र बाबासाहेब उर्फ भाऊ गजानन गाढवे, अक्षय चंद्रकांत पाडळे असे मिळून तिघांनी सौरभ यास ठार मारल्याची कबुली दिली. त्याचा मृतदेह शिर्सुफळ येथील तलावमध्ये दगड बांधून टाकून दिल्याचे देखील सांगितले. त्यानंतर गुन्हयातील आरोपींना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.


हेही वाचा -

  1. Minor Girl Murder Thane: एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्या करून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
  2. Nashik Crime News : दारुच्या पार्टीत जिगरी मित्रांनीच केला मित्राचा खून; शहरात एका महिन्यात पाच खून
  3. Crime News : धक्कादायक! अवघ्या 100 रुपयांसाठी बापाने पोराचा गळा चिरला!

ABOUT THE AUTHOR

...view details