महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Baramati Rape अल्पवयीन मुलीला ओढत नेत शेतात बलात्कार - इंदापूर पोलीस

Baramati Crime राज्यात महिला अत्याचाराच्या घटना काही थांबवण्याचं नाव घेत नाहीयेत. इंदापूरमध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे. इथे एका अल्पवयीन मुलीवर Indapur Crime बलात्कार केल्याची घटना उघड आली आहे.

Baramati Crime
Baramati Crime

By

Published : Aug 22, 2022, 2:20 PM IST

इंदापूरएका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस बळजबरीने शेतात ओढून नेत, तिच्यावर बलात्कार केल्याची घटना बेलवाडी ता. इंदापुर येथे घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून, वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Baramati Crime पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे.

2 व्यक्तींविरूद्ध गुन्हा दाखल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून वालचंदनगर पोलीस ठाण्यात आरोपी राहुल हनुमंत जाधव रा बेलवाडी ता इंदापुर यासह इतर 2 व्यक्तींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Baramati Crime 20 तारखेला सकाळी 11 वाजेच्या सुमारास मौजे बेलवाडी ता इंदापुर येथील मक्याच्या शेतात Indapur Crime ही धक्कादायक घटना घडली आहे.

मुलीवर जबरदस्तीने अत्याचारआरोपी राहुल जाधव याने पीडित मुलीला जबरदस्तीने मक्याच्या रानात ओढत नेत अत्याचार केला आहे. काही वेळाने तेथे ओमनी गाडीतून तोंडाला रुमाल बांधलेले 2 व्यक्ती आले होते. त्यातील एकाने मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केला आहे. Baramati Crime यानंतर आरोपींनी तिला गाडीत बसवून बेलवाडी बसस्थानकावर सोडल्याचे मुलीने सांगितले आहे. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत आरोपी राहुल जाधव यास अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जी. पी. इंगळे हे करत आहेत.

हेही वाचाUdayanraje Bhosale सातार्‍यातील दहीहंडीत उदयनराजेंचा जलवा अन तरूणाईचा जल्लोष, पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details