महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Baramati City Central : पॅरिसच्या धर्तीवर बारामतीमध्ये 'सिटी सेंट्रल' उभारणार; पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र - उपमुख्यमंत्री अजित पवार

पॅरिस शहरातील 'सिटी सर्कल'च्या धर्तीवर 'सिटी सेंट्रल'ची ( Baramati City Central ) उभारणी करण्यात येणार आहे. हे काम लवकरच सुरू होणार आहे. नीरा डावा कालव्यावरील पूलाचे काम पूर्णत्वास गेले असून लवकरच इतर कामेही सुरु होणार आहेत. जवळपास चौदा कोटी रुपये खर्चून बारामती शहराच्या मध्यवर्ती भागातील हा चौक नव्याने सुशोभित केला जात आहे.

Baramati
बारामती

By

Published : Dec 4, 2021, 9:36 AM IST

बारामती - फ्रान्सच्या पॅरिसमधील 'सिटी सर्कल'च्या धर्तीवर बारामतीत 'सिटी सेंट्रल' ( Baramati City Central ) प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. बारामतीच्या वैभवात भर घालणारा पॅरिस देशातील सिटी सेंटरच्या धर्तीवर शहरातील तीन हत्ती चौक या ठिकाणी 'सिटी सेंटर' उभारण्यात येणार आहे. बारामती हे राजकीय, सामाजिक, साहित्य, कलाक्रीडा, वैद्यकीय आदी क्षेत्रात अग्रेसर तर आहेच. मात्र या 'सिटी सेंटर' मुळे बारामतीची एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे.

बारामतीमध्ये 'सिटी सेंट्रल'
बारामतीच्या विकासाचा मुकूटमणी नीरा डावा कालवा व करा नदी सुशोभीकरणाचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2014 साली घेतला. यासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वास्तूविशारद पिके दास यांनी या कामाचे रेखांकन व आराखडे तयार केले. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात येत असणारा हा 'सिटी सेंटर' हा नीरा डावा कालव्याच्या सुशोभीकरणाचा एक भाग आहे. तीन हत्ती चौक हा बारामतीचा मध्यवर्ती भाग आहे. समोरच नगरपालिका व त्याला लगतच हुतात्मा स्मारक व भिगवन चौक आहे. याठिकाणी भिगवन रस्त्यावरून येणारी वाहतूक नटराज नाट्य मंदिराच्या बाजूने कालव्यावरील पुलावरून भिगवन चौकाकडे जाणार आहे. बाजूने वळण घेणारा रस्ता व मधल्या वर्तुळाकार जागेचे सुशोभीकरण करून लोकांना या ठिकाणी संध्याकाळी काही वेळ निवांतपणे घालवता येणार आहे. या सेंटरमुळे शेजारूनच वाहत असणारा नीरा डावा कालवा असल्याने हा परिसर नेत्रदीपक असा असणार आहे.भविष्यात हा परिसर आकर्षणाचा एक भाग असणार -शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी निर्माण होणाऱ्या सिटी सेंटर शेजारी नगरपालिकेची भव्य वास्तू तसेच वसंतनगर भिगवनकडे जाणारा रस्ता तसेच माळावरच्या देवीकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या अगदी मध्यभागी असणार आहे. या सिटी सेंटर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार असून, बारामतीकरांसाठी याठिकाणी सेल्फी पॉईंटही केले जाणार आहेत. भविष्यात हा परिसर शहराच्या आकर्षणाचा एक भाग असणार आहे. सदर प्रकल्प हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत आहे. तब्बल चौदाशे कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे रेखांकन व आराखडे वास्तू विशारद पिके दास यांनी तयार केले आहे. सदर प्रकल्पाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग व पाटबंधारे विभागाच्या संयुक्त विद्यमाने केले जात आहे. अशी माहिती बारामती नगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details