पुणे - कोणत्याही परिस्थितीत जोपर्यंत ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका घेत वंजारी समाजाने घेतली आहे. यामुळे ओबीसी आरक्षणासाठी आता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ( Banjara Community on OBC Reservation )
भगवान गड ते मुंबई ओबीसी आरक्षण संघर्ष पदयात्रा काढणार -
जय भगवान महासंघाचा रविवारी पुण्यामध्ये भव्य मेळावा भरवण्यात आला. यावेळी ओबीसी आरक्षणासाठी भगवान गड ते मुंबई ओबीसी आरक्षण संघर्ष पदयात्रा काढणार असल्याचे ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी जाहीर केले आहे. ( OBC Leader Balasaheb Sanap )