पुणे- कोंढवा आणि आंबेगाव येथे भिंत पडून झालेल्या दुर्घटनेला तीन आठवडे उलटूनही अद्याप प्रशासनाकडून राज्य सरकारला अहवाल सादर करण्यात आलेला नाही. याबाबत मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री बाळा भेगडे यांना विचारले असता, आणखी 8 दिवसांत याबाबतचा अहवाल देऊ, अशी माहिती त्यांनी दिली. सोमवारी पुण्यात झालेल्या वार्तालाप कार्यक्रमात बाळा भेगडे बोलत होते.
कोंढवा दुर्घटनेचा 8 दिवसांत अहवाल सादर करू - बाळा भेगडे - भिंत
8 दिवसांत कोंढवा दुर्घटनेचा अहवाल सादर करू, अशी माहिती बाळा भेगडे यांनी दिली.
8 दिवसांत कोंढवा दुर्घटनेचा अहवाल सादर करु - बाळा भेगडे
तीन आठवडे उलटूनही याबाबत अहवाल दिलेला नाही. त्यामुळे राज्य सरकार याबाबत गंभीर आहे का नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोंढवा आणि आंबेगाव येथे घडलेल्या घटनेत भिंत कोसळून तब्बल 21 जणांचा जीव गेला होता.