पुणे-आमच्यासाठी कंगनाचा विषय महत्वाचा नाही, तर शेतकऱ्यांचा विषय महत्वाचा आहे. माध्यमांनी कंगनाचा विषय बंद करावा, असे वक्तव्य राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ येथे एका कामासाठी बच्चू कडू पुणे येथे आले होते.
शिक्षण विभागातील नियम, वाटा व बेकायदेशीर काम याबाबत राजकुमार वाडकर यांनी तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने सुनावणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ येथे आयोजित करण्यात आली होती. या सुनावणीसाठी राज्यमंत्री बच्चू कडू पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांना कंगना रणौतबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत त्यांनी मत व्यक्त केले.