पुणे - गर्भवती महिलेचे डोहाळे पुरवल्याचे आपण ऐकले असेल. मात्र, पुण्यात एका वृक्षप्रेमी महिलेने नारळाच्या झाडाचे डोहाळे जेवण केले. नारळाच्या झाडाला पहिला तुरा आल्याने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी झाडाला साडी नेसवून एखाद्या गर्भवती महिलेसारखा शृंगार करण्यात आला होता.
पुण्यात नारळाच्या झाडाचे डोहाळे जेवण; पहिला तुरा आल्याने भरली ओटी - नारळाच्या झाडाचे डोहाळे जेवण
पुण्यात नारळाच्या झाडाचे डोहाळे जेवण करण्यात आले. मैत्रीणींना ओटी भरण्यासाठी बोलावले. झाडाला साडी नेसवून शृंगार केला. डोहाळे गीत गात एखाद्या गर्भवती बाईचे ओटीभरण होते. त्याचप्रमाणे नारळाच्या झाडाची ओटी भरण्यात आली.
हे वाचलं का? -पुणे जिल्ह्यात दूध उत्पादनात मोठी घट; शेतकरी चिंताग्रस्त
नीता यादवाड, असे या वृक्षप्रेमी महिलेचे नाव आहे. त्या शहरातील कर्वेनगर परिसरात राहतात. त्यांच्या बंगल्याच्या आजूबाजूला अनेक वृक्ष आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी कोकण विद्यापीठातून नारळाचे झाड आणून घरातील बागेत लावले. मात्र, पुरेशा सुर्यप्रकाशाअभावी ते झाड वाढणासे झाले. त्यानंतर त्यांनी ते झाड तिथून काढून दुसऱ्या ठिकाणी लावले. त्याला पाणी देऊन ते जीवंत राहील याची पूर्ण खबरदारी घेतली. गेल्या ३ आठवड्यांपूर्वी त्याला पहिला तुरा आला. त्यामुळे आपल्या नारळाच्या झाडाला नारळ येणार या आनंदात त्यांनी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम ठेवला. मैत्रीणींना ओटी भरण्यासाठी बोलावले. झाडाला साडी नेसवून शृंगार केला. डोहाळे गीत गात एखाद्या गर्भवती बाईचे ओटीभरण होते त्याचप्रमाणे नारळाच्या झाडाची ओटी भरण्यात आली.