पुणे- मोदी सरकारच्या काळात कष्टकऱ्यांच्या तोंडचा घास पाळविणाचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे, त्यामुळे या निवडणुकीत त्यांना पाडा, असे आवाहन कामगार नेते बाबा आढाव यांनी केले. गुरूवारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका जाहीर केली.
भाजप सरकारने जनतेला फसवले, गिरीश बापटांना मतदान करू नका - बाबा आढाव - pc
भाजपला मतदान करू नका, भाजप सरकारने जनतेला फसवलं आहे.असे आवाहन कामगार नेते बाबा आढाव यांनी केले
कामगार नेते बाबा आढाव
भाजपला मतदान करू नका, भाजप सरकारने जनतेला फसवलं आहे. रिक्षावाल्यांना पासिंग करण्यासाठी दिवे घाटात जावे लागते. त्यांना हा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासोबतच केंद्राचे धान्य बंद करण्यात आले आहे. केंद्र सरकारने धान्य राज्य सरकारला दिले आहे, मात्र बापट मंत्री असताना हे मिळणे बंद झाले. त्यामुळे या निवडणुकीत गिरीश बापट यांना पाडा, असे आवाहन बाबा आढाव यांनी केले आहे.