पुणे- रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावरील सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक खटल्याचा निकाल आज लागला. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात आज सकाळी पासूनच कडेकोट बंदोबस्त होता. दीड हजारहून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी रस्त्यावर उतरले होते. खुद्द पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी शहरातील अनेक ठिकाणी सुरक्षेविषयी पाहणी केली.
अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमिवर पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांना शांततेचे आवाहन - अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमिवर पिंपरी चिंचवडमध्ये सुरक्षा व्यवस्था
रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावरील सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक खटल्याचा निकाल आज लागला. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात आज सकाळी पासूनच कडेकोट बंदोबस्त होता. दीड हजारहून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी रस्त्यावर उतरले होते. खुद्द पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी शहरातील अनेक ठिकाणी सुरक्षेविषयी पाहणी केली.
गेल्या कित्येक वर्षांपासूनचा सर्वात महत्वाचा रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. या पार्श्वभूमिवर शहरात शांततेचे आवाहन करण्यात आले होते आणि शहरात मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा शहरात तैनात करण्यात आला होता. यावेळी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी लालटोपी नगर, मोरवाडी मशीद, नेहरू नगर, पिंपरी पूल, काळेवाडी येथील मशीद, दापोडी मशीद, भोसरी, चक्रपाणी वसाहत, कुदळवाडी, रूपीनगर, ओटा स्कीम, वाल्हेकरवाडी या ठिकाणी जाऊन सुरक्षेसंदर्भात पाहणी केली.
शहरात सर्वत्र शांतता असून सगळ्यांना शांतता ठेवण्याचे आवाहन पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी केले. जिथे शांतता नांदते तिथे विकास होतो. जिथे शांततेचा भंग होतो तिथे देशाचे आणि नागरिकांचे नुकसान होते. दीड हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी रस्त्यावर गस्त घालत आहेत. SRPF ची कंपनी आहे, प्रत्येक पोलीस ठाण्यात शांतता बैठकीच आयोजन करण्यात आले होते. फेसबुक, व्हाट्सऍप वर आक्षेपार्ह पोस्ट टाकू नका. आम्ही सोशल मीडियावर नजर ठेवून आहोत, कोणीही आक्षेपार्ह कृत्य केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही यावेळी त्यांनी सांगितले.