पुणे:ओबीसींना आपले फुटसोल्जर म्हणून वापरणारे प्रस्थापितांचे सरकार आता मात्र ओबीसीं विषयी प्रेम दाखवण्याची स्पर्धा भरवतायेत ते निव्वळ हास्यास्पद व फसवे आहे. कारण सर्वोच्च न्यायलयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करेपर्यंत यांनी दिड वर्ष नुसत्या तारखा घेतल्या. केंद्राच्या नावाने ओरड केली. आता मात्र यांची पायाखालची जमिन सरकलेली आहे. आत्ताही ते काय करतायेत याबद्दल कुठलीच माहीती नाही. राज्यमागासवर्ग आयोग कुठे हरवला आहे? ओबीसी उपसमिती कुठे आहे? इंपेरिकल डेटा गोळा करण्याचं काम सुरू केलंय का? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत असताना मात्र या सरकारचे मंत्री मोठमोठ्या शिळोप्याच्या गप्पा मारण्यात व्यस्त आहेत.अशी टिका भाजपाचे आमदार आणि नेते गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी केली आहे.
आव्हाड कोणता इतिहास वाचतात माहीत नाही
जितेंद्र आव्हाड म्हणतात माझा ओबीसीवर विश्वास नाही, कारण मंडल आयोग येताना ते लढले नाहीत. आव्हाड कोणता इतिहास वाचतात माहीत नाही, पण मंडल आयोगाला प्रस्थापितांनी विरोध केला. वंचितांच्या आरक्षणाला नाक मुरडली. शेकडो ओबीसींनी स्वतला पेटवून घेतलं होते. हा ओबीसींचा इतिहास माहीत नाही का तुम्हाला? कदाचित प्रस्थापितांना खूश करण्यासाठीचे ते कंत्राटी कामगार आहेत.ओबीसींवर तुम्हाला एवढच प्रेम असेल तर भारतीय जनता पक्ष सर्वच ठिकाणी फक्त आणि फक्त ओबीसी उमेदवार देणार आहे,त्यांना आपण निवडूण द्यावे. अन्यथा तुम्हीही फक्त ओबीसीच उमेदवार देणार आहात, असे तरी जाहीर करावे.असं देखील यावेळी पडळकर म्हणाले.