पुणे :Cyber Crime:पुण्यासह महाराष्ट्रभर सध्या वीज पुरवठा खंडित (Phones to cut off power supply) करण्याच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी धुमाकूळ (cyber thieves) घातला आहे. त्यामुळे अनेक नागरिकांची फसवणूकसुद्धा झाली आहे. पुण्यातील पोलीस अधिकारी निलेश महाडिक (awareness of Police officers Nilesh Mahadik) यांनी अशा फसवणुकीपासून लोकांना सावध करण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत जनजागृतीचे (social media awareness) व्हिडिओ सोशल माध्यमावर अपलोड केले. आता ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. Latest news from Pune, Pune Crime
पोलीस सेवेसह जनजागृतीही-पुण्यातील चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यामध्ये एका सायबर चोरट्याने एका महिलेला एक लाखाचा गंडा घातल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. समाजामध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. पोलीस आणि महावितरणकडून याबद्दल सातत्याने आव्हान करण्यात येत आहे; परंतु सर्वसामान्यांची आपण फसवणूकपासून सुटका व्हावी यासाठी एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याने सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करत जनजागृती करणे सुरू केला आहे.